मणीपूरमधील आतंकवादी आक्रमणामध्ये सैन्याधिकारी आणि ३ सैनिक हुतात्मा

सैन्याधिकार्‍याची पत्नी आणि मुलगाही ठार

गेल्या काही दशकांपासून आतंकवादी आणि नक्षलवादी यांचा मुळासकट निःपात करण्यास भारत पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने अशा घटना घडत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

कर्नल विप्लव त्रिपाठी त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू

इम्फाळ (मणीपूर) – मणीपूरच्या सूरज चंद जिल्ह्यात १३ नोव्हेंबर २०२१च्या सकाळी म्यानमार सीमेजवळ एस् सेहकेन गावात आतंकवाद्यांनी घडवून आलेल्या बाँबस्फोटात ‘आसाम रायफल्स‘चे कर्नल विप्लव त्रिपाठी आणि ३ सैनिक हुतात्मा झाले, तर कर्नल त्रिपाठी यांची पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू झाला. या भागातून सैन्याधिकार्‍यांचा ताफ जात असतांना आधीपासूनच लपून बसलेल्या आंतकवाद्यांनी स्फोट घडवून आणला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या आक्रमणाला ‘भ्याड’ संबोधत याचा निषेध केला. ‘दोषींना सोडणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.

या आक्रमणामागे मणीपूरच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या आतंकवादी संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे. स्वतंत्र मणीपूरची मागणी करत वर्ष १९७८ मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती. भारत सरकारने या संघटनेला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे. या संघटनेकडून सुरक्षादलावर वारंवार आक्रमणे करण्यात येतात.