मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम्.पी.एस्.सी.च्या) परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाने घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. १९ नोव्हेंबर या दिवशी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.
दोन वर्षे कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी, अशी मागणी होती. एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे, अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.