१. ‘स्वतःला श्रेष्ठ मानणारे, सदैव उद्धट वागणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधी कधी शास्त्रांच्या विधी-विधानांचे पालन न करता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात. (देवळात दर्शन घेतात.) (श्रीमद्भगवद्गीता १६, श्लोक १७)
२. मिथ्या अहंकार, बळ, गर्व, काम आणि क्रोध यांमुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या आणि इतरांच्या देहांमध्ये असणार्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खर्या धर्माची निंदा करतात. (श्रीमद्भगवद्गीता १६, श्लोक १८)