जीवनातील सत-चित्-आनंद । जीवन माझे समर्पित सनातन ।। धृ. ।।
पिंडाला आकार मिळाला । आकाराचा नरदेह झाला ।।
नरदेहाला तृष्णा नित्यनूतन । जीवन माझे समर्पित सनातन ।। १ ।।
मार्गक्रमण हे जीवनाचे । ध्येय आमुचे मोक्षप्राप्तीचे ।।
प्रगतीचा हा मार्ग चिरंतन । जीवन माझे समर्पित सनातन ।। २ ।।
साधनेचा मार्ग हा सुखकर । मोक्षाप्रती नेई सत्वर ।।
गुरुकृपेचा आशिष निरंतर । जीवन माझे समर्पित सनातन ।। ३ ।।
लक्षावधी साधक सत्वर । रामराज्याशी झाले तत्पर ।।
विश्वगुरु हिंदु राष्ट्र हे चिंतन । जीवन माझे समर्पित सनातन ।। ४ ।।
– श्री. रामकृष्ण शिवलिंग चिंचकर, सातारा रस्ता, पुणे. (मे २०२१)