देवा, तुझ्या दृष्टीचा आरसा सतत माझ्यासमोर असू दे ।

सौ. सुनीता पंचाक्षरी

देवा, नष्ट कर ही स्वभावदोष-अहंरूपी मनाची जळमटे ।
जरी लपवली आम्ही, तरी तुझ्या दृष्टीतून नाही सुटायची ।। १ ।।

देवा, थकले मी आता सोडण्या ही माया ।
घेऊ दे आता छत्ररूपी गुरुदेवांची छाया ।। २ ।।

किती सांगतोस तू देवा, माझ्या उद्धारासाठी ।|
कसे कळेना मला, हे सर्व आहे माझ्या कल्याणासाठी ।। ३ ।।

सद्गुरु माऊलीने, किती कष्ट घेतले माझ्यासाठी ।
परि मी अभागी, कळेना मला आहे हे माझ्यासाठी ।। ४ ।।

प्रतिमेने उद्ध्वस्त झाले माझे आयुष्य ।
आतातरी भवसागरातून पार व्हायचे भान असू दे मज ।। ५ ।।

काय करू देवा, आता काय करू देवा ।
तुझ्या चरणी येण्यासाठीच आता असू दे माझा धावा ।। ६ ।।

देवा, कुठे चुकते माझे हे प्रत्येक क्षणी शोधता येऊ दे ।
तुझ्या दृष्टीचा आरसा सतत माझ्यासमोर असू दे ।। ७ ।।

जय गुरुदेव । जय गुरुदेव ।।

– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबेजोगाई, जिल्हा बीड. (८.८.२०१८)