आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?

‘गोवा पोर्तुगिजांच्या कह्यातून मुक्त झाला; मात्र लोकांमधील गुलामी मानसिकता अजूनही तशीच आहे. याविषयी पुढील प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधणे अपेक्षित आहे.

(यासंदर्भातील १२ आणि १३ ही सूत्रे आपण २४.१०.२०२१ या दिवशीच्या अंकात पाहिली. आज त्यापुढील सूत्र पाहूया.)

प्रा. सुभाष वेलिंगकर

गोव्यातील ५१ किल्ल्यांची डागडुजी आणि जतन, हॉटेल चालवायला विकलेले किल्ले परत घेऊन त्यांचा सन्मान राखणे, हे एवढ्या वर्षांत जमू नये ? खासगी मालकांना विकलेल्या भूमीत अंतर्भूत असलेले महत्त्वाचे ऐतिहासिक अवशेष नोंद न घेता नामशेष होऊ दिले जात आहेत. किती गोष्टी सांगायच्या ? स्वतः सरकारेच मानसिक गुलामगिरीत आहेत. क्रांतीदिन, मुक्तीदिन केवळ मिरवण्यापुरते आणि नेत्यांनी सलामी घेण्यापुरतेच मर्यादित राहिले ! सार्थ क्रांतीदिन, सार्थ मुक्तीदिन पुढच्या पिढ्यांना तरी पहाता येईल का ? सत्ता आणि लांगूलचालन यांच्या पलीकडे जाऊन, राष्ट्रीयतेची जाणीव असणे हाच तरणोपाय आहे. स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग सत्ताधार्‍यांनी निष्फळ ठरवलेला आहे ! दैवदुर्विलास ! दुसरे काय ?

(समाप्त)

– प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर, भारतमाता की जय संघटना, गोवा.’