सुवर्ण सिंहासनासाठी दोडामार्गमधील तरुण देणार खडा पहारा

( प्रतिकात्मक चित्र )

दोडामार्ग – लवकरच श्री रायगड किल्ल्यावर ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापित होणार आहे. या सिंहासनाच्या रक्षणासाठी दोडामार्ग तालुक्यातील २ सहस्र तरुण वर्षातून १ दिवस श्री रायगड किल्ल्यावर जाऊन सिंहासनासाठी पहारा देणार आहेत. यासाठी तालुक्यातील तरुणांची नावनोंदणी करण्यात येत आहे.

रायगडावरील ३२ मण सुवर्ण सिंहासनाला खडा पहारा देण्यासाठी नावनोंदणी चालू असून प्रत्येक गावात बैठका घेण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व तरुणांना नावनोंदणी करण्याचे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्गच्या वतीने करण्यात आले आहे.