झोपलेले पोलीस !
‘मंगळवार, २८ सप्टेंबर २०२१ या दिवशी सकाळी ९.१५ वाजता मडगाव (गोवा) येथील राय येथील चर्चजवळ एम्.एच्.२४ ए.यू. ७४०० क्रमांकाच्या वाहनातून महाराष्ट्रातून अवैधपणे आणण्यात आलेला एक बैल मायणा पोलिसांनी कह्यात घेतला. महाराष्ट्रात लातूर येथे रहाणारा या वाहनाचा चालक देवीदास कोल्हे याच्याकडे सोलापूर येथून बैलाला गोव्यात आणण्याविषयीची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. बैलाची अवैधपणे वाहतूक होत आहे, ही माहिती ‘ध्यान फांऊडेशन’ने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस खात्यातील वारीक या अधिकार्याने त्वरित वाहन कह्यात घेऊन मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात नेले. ‘बैलाची अवैधपणे वाहतूक करून त्याची हत्या करण्यासाठी गोव्यात आणले गेले आहे’, अशा आशयाची तक्रार ‘राष्ट्रीय भगवा हिंदू वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा यांनी पोलीस ठाण्यात केली.’
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयाला कळवा. |