भारत-पाक सीमेवर ३ वर्षांनी दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना दिली मिठाई !

पुलवामा येथील आक्रमणानंतर बंद झाली होतील परंपरा !

  • पाकने असे कोणते कार्य केले म्हणून भारताने ही परंपरा पुन्हा चालू केली ? पाक आणि त्याचे पुरस्कृत आतंकवादी सातत्याने काश्मीरमध्ये आक्रमण करत असतांना पाकला मिठाई देणे आणि त्याची मिठाई घेणे, यांचे औचित्य काय ? – संपादक
  • हा सापाला दूध पाजण्याचाच प्रकार नव्हे का ? – संपादक
भारत-पाक सीमेवर दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना दिली मिठाई

नवी देहली – भारत-पाकिस्तान सीमेवर ३ वर्षांनंतर दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई दिली. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आदी सीमांवर मिठाई वाटण्यात आली. यापूर्वी प्रतिवर्षी ही परंपरा होत होती; परंतु काश्मीरमधील पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर ही परंपरा खंडित झाली होती.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर भारताचे सीमा सुरक्षा दलाचे सैनिक आणि पाकिस्तानी सैनिक यांनी एकमेकांना मिठाई दिली. पंजाबच्या अमृतसर येथील प्रसिद्ध अटारी-वाघा सीमेवर भारत आणि पाक सैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवली. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील सीमेवरही सैनिकांकडून अशाच प्रकारे मिठाई वाटण्यात आली.