सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा ! सर्वांची दीपावली आनंदमय होवो.
साधक किती भाग्याचे, देव सहवासात रहाती नित्य ।
दीपावलीची प्रत्येक पणती प्रकाशते शीतलता देऊन ।
या शीतल प्रकाशात उजळतो आश्रम आनंद घेऊन ।। १ ।।
साधक किती भाग्याचे, देव सहवासात रहाती नित्य ।
दीपावलीच्या सणात तुझ्याशी बोलण्याचे हे निमित्त ।। २ ।।
आनंद असतो ना भक्ताला देवाशी गोड बोलण्याचा ।
कारण देव वाट पहातो पत्र येण्याची ।। ३ ।।
देवा, ठेव ना ध्यानात जरा । भक्तही वाट पहातो ना.. ।। ४ ।।
– पुष्पांजली, बेळगाव, कर्नाटक. (२७.१०.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |