रांगोळीच्या आकारांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली काही सूत्रे

कु. संध्या माळी

१. अर्ध्या फुलापेक्षा पूर्ण फुलातून चांगली स्पंदने येणे

‘आकृती ‘अ’मध्ये अर्धे फूल मधून कापल्यासारखे दिसते. फुलाच्या पाकळ्या वेगवेगळ्या केल्यास अथवा फुलाचे दोन भाग केल्यास विडंबन होते. त्यामुळे त्यातून चांगली स्पंदने येत नाहीत.

आकृती ‘आ’मध्ये पूर्ण फूल असल्यामुळे ते वास्तव वाटते. त्यामुळे ते बघायला चांगले वाटते आणि त्यातून चांगली स्पंदने येतात. या फुलाकडे बघून काहींना भावाची आणि त्या संदर्भातील देवतेच्या तत्त्वाची अनुभूतीही येते.

२. चौकोनी आकारापेक्षा गोल आकाराचे फूल चांगले वाटणे

४ पाकळ्यांच्या फुलामुळे चौकोन तयार होतो. त्यामुळे ‘अ’ ही रांगोळी चांगली वाटत नाही.

आकृती ‘आ’मधे ५ – ६ अथवा त्यापेक्षा अधिक पाकळ्यांचे फूल काढल्यास ते गोलाकार दिसते. फुलाचा गोलाकार वास्तवतेच्या अधिक जवळ आल्याने ते चांगले वाटते; परिणामी फुलात देवतेचे तत्त्व येण्यास साहाय्य होते.

३. मध्यभागी एक पाकळी असलेल्या फुलाकडे पाहून उत्साह वाटणे

आकृती ‘अ’मध्ये फुलात मध्यभागी उभी रेष काढल्यास तिच्या आजूबाजूला दोन पाकळ्या (आकृतीतील १ आणि २) असल्याने फूल निष्क्रीय वाटते. त्यामुळे ते चांगले वाटत नाही.

आकृती ‘आ’ मधे फुलात मध्यभागी उभी रेष काढल्यास मध्यभागी एकच (आकृतीतील १) पाकळी असल्याने ‘फूल कार्यरत आहे’, असे वाटते. त्यामुळे त्याकडे पाहून उत्साह वाटतो.

– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०१७)