त्रिशूर (केरळ) येथे भाजपच्या एका कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तिची राजकीय संघटना एस्.डी.पी.आय.वर संशय

  • केरळमध्ये माकपची सत्ता असतांना भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या सातत्याने होणार्‍या हत्या पहाता ‘तेथे कायदा आणि सुव्यवस्था आहे का ?’ असा प्रश्‍न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी का विचारत नाहीत ? अशा घटना पुरो(अधो)गाम्यांविषयी भाजपच्या राज्यात घडतात, तेव्हा हेच लोक देश डोक्यावर घेतात, हे लक्षात घ्या !
  • संवेदनशील राज्ये, शहरे आदी ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ नेते, पदाधिकारी आदींचे रक्षण होण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना विशेष संरक्षण पुरवण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
भाजपचे ३५ वर्षीय कार्यकर्ते कोप्पारा बीजू

त्रिशूर (केरळ) – येथे भाजपचे ३५ वर्षीय कार्यकर्ते कोप्पारा बीजू यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. बीजू २ मासांपूर्वी आखाती देशांतून नोकरी करून परतले होते. सध्या ते येथील मनाथला नागायक्षी मंदिराजवळ पाळीव कबुतरे विकण्याचा व्यवसाय करत होते.

३१ ऑक्टोबर या दिवशी बीजू यांच्या दुकानाजवळ सजीवन नावाच्या तरुणाचा काही लोकांशी वाद झाला होता. या वादातूनच बीजू यांना सजीवन समजून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बीजू यांच्या हत्येनंतर भाजपने येथे ‘बंद’चे आवाहन केले होते. ‘या हत्येमागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तिची राजकीय संघटना एस्.डी.पी.आय. (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) यांचे कार्यकर्ते आहेत’, असा आरोप भाजपने केला आहे. या हत्येद्वारे येथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्याचाही दावा करण्यात आला.