हिंदु राजकारण्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यास गोव्यातील हिंदू त्यांना क्षमा करणार नाहीत ! – जयेश नाईक

मडगाव, १ नोव्हेंबर (वार्ता.)  हिंदु राजकारण्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यास त्यांना गोव्यातील हिंदु क्षमा करणार नाहीत, अशी चेतावणी मडगाव येथील श्री स्वामी समर्थ गड मंदिराचे अध्यक्ष जयेश नाईक यांनी मडगाव येथे दिली आहे. या वेळी ते म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चील आलेमाव हे रुमडामळ येथील काही सामाजिक घटकांना पाठींबा देत आहेत. त्यांनी तसे केल्यास येत्या निवडणुकीत बाणावली आणि नावेली भागात त्यांचा पराभव करण्यासाठी हिंदु सक्रीय होतील. ममता बॅनर्जी यांच्या बंगालमध्ये हिंदूंवर आणि महिलांवर अत्याचार होत असल्याने ममता बॅनर्जी यांना गोव्यातील हिंदू मुळीच पाठिंबा देणार नाहीत. गोव्यातील हिंदू आणि राजकारण्यांनी ममता बॅनर्जी यांना साहाय्य करू नये अशी आमची इच्छा आहे.’’