या पृथ्वीतलावर आहे माझी गुरुमाऊली एक ।

श्री. अण्णा मारुति शिंदे

या पृथ्वीतलावर आहे माझी गुरुमाऊली एक ।
कधी न मिळणार तशी शोधूनी त्रैलोक्यात ।। १ ।।

येते अनंत रूपे धारण करूनी भाववृद्धी सत्संगात ।
तिज बसवूनी मी पुजितो मम हृदय मंदिरात ।। २ ।।

कितीतरी जन्मांपासून तिला भेटण्याची मनी होती आस ।
थकलो-भागलो-दमलो परि लागला तिच्या दर्शनाचा ध्यास ।। ३ ।।

तीच गुरुमाऊली लाभली आजच्या या कलियुगात ।
तिच्याच कृपेने आज येता आले तिच्या दर्शनास ।। ४ ।।

वाटते सारखे रहावे गुरुमाऊलीच्या चरणी ।
शोधूनी पहावी परशुरामाची ती धरणी (टीप) ।। ५ ।।

मज वाटे प्रतिदिन एकदा तिने स्वप्नात यावे ।
अन् हालवून मला हळुवार अढळ मोक्षासी न्यावे ।। ६ ।।

टीप – परशुरामभूमी गोवा

– श्री. अण्णा मारुति शिंदे, भोलावडे, भोर, पुणे. (६.४.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक