विभाग, केंद्र यांमध्ये एक जरी चांगला साधक असला, तरी तेथे शिकण्याची वृत्ती असलेले सर्वच साधक सुधारतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘साधकाचे साधकत्व हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत असते. साधकत्व असणार्‍याचा प्रभाव इतरांवर लगेच पडतो. त्या साधकाच्या वागण्या-बोलण्यातून ‘लहान-सहान प्रसंगांमध्येही आपण साधना कशी करू शकतो ? एखाद्या प्रसंगांमध्ये योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे त्याच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना शिकायला मिळते. त्यामुळे त्यांचीही साधना चांगली होते. त्यामुळे भौतिकशास्त्राच्या संस्पंदनांच्या परिणामाप्रमाणे (‘रेझोनन्स इफेक्ट’प्रमाणे) त्या साधकाच्या संपर्कात असणार्‍या साधकांमध्येही सकारात्मक पालट दिसून येतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.१०.२०२१)


‘विज्ञानाला अध्यात्मशास्त्राचे प्रमाणपत्र लागत नाही. मग अध्यात्माला विज्ञानाचे प्रमाणपत्र कशाला ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (वर्ष २०१८)