देव केवळ भक्तांना साहाय्य करतो, तसे संत त्यांच्या कुटुंबियांना नाही, तर त्यांच्या भक्तांना साहाय्य करतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘देवता सर्वच मनुष्यांना साहाय्य करत नाहीत. एखादी व्यक्ती त्या देवतेची भक्ती करू लागली की, ती देवता तिचे पूर्ण दायित्व घेते. त्या भक्ताच्या जीवनात येणार्‍या अडीअडचणींचा त्याच्या साधनेवर परिणाम होऊ नये; म्हणून देवता त्याला साहाय्य करते. संतांचे कार्यही असेच असते. संत त्यांच्या भक्तांच्या साधनेत खंड पडू नये, यासाठी त्यांना सर्वतोपरी साहाय्य करतात; पण ते कधीही ‘माझे कुटुंबीय’ या भावनिक विचाराने त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करत नाहीत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१०.२०२१)