मूळची संभाजीनगर येथील कु. कल्याणीस्वरूपा (कु. कल्याणी) मागील अडीच वर्षांपासून सनातनच्या रामनाथी आश्रमात रहात आहे. रामनाथी आश्रमात रहाणारी तिची आजी श्रीमती जयश्री मुळे, तसेच महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली तिची मोठी बहीण कु. करुणा सुजित मुळे (वय १६ वर्षे) यांना जाणवलेली कल्याणीस्वरूपाची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्म ते १ वर्ष
१ अ. ‘सुनेला मुलगा व्हावा’, अशी अपेक्षा असतांना मुलगी झाल्यावर ‘देवाने दिलेला प्रसाद’, असे समजून परिस्थिती स्वीकारणे : ‘७.५.२००९ या दिवशी माझ्या सुनेची (सौ. साधना मुळे हिची) प्रसुती होऊन तिला दुसर्या खेपेलाही मुलगी झाली. प्रसुतीतज्ञांनी मला नातीला पहायला बोलावले आणि म्हणाल्या, ‘‘किती गोरीपान आहे तुमची नात !’’ ‘सुनेला मुलगा व्हावा’, अशी माझी अपेक्षा होती; पण ‘हा देवाने दिलेला प्रसाद आहे’, असे वाटून मला सर्व परिस्थिती आपोआप स्वीकारता आली.
१ आ. भजने आणि देवाची गाणी ऐकून बाळाला आनंद होणे : प्रसुतीनंतर सुनेची प्रकृती चांगली नसल्याने मीच नातीला (कल्याणीस्वरूपाला) सांभाळत असे. तिला बाटलीने दूध पाजतांना मी आणि करुणा श्लोक अन् भजने म्हणायचो. भजने ऐकून कल्याणीला आनंद व्हायचा.’
– श्रीमती जयश्री मुळे (कु. कल्याणीस्वरूपाची आजी)
१ इ. रडणार्या कल्याणीला भजने किंवा कृष्णाची गाणी ऐकवली की, ती शांत होणे : ‘कल्याणी स्वभावाने चंचल आणि हट्टी असल्यामुळे ती रडायला लागली की, मी तिला संत भक्तराज महाराज यांची भजने किंवा कृष्णाची गाणी ऐकवत असे अन् गोष्टीही सांगत असे. तेव्हा ती शांत व्हायची आणि एकाग्रतेने ऐकायची.’ – कु. करुणा मुळे (कल्याणीची मोठी बहीण)
२. वय – २ ते ४ वर्षे
२ अ. कल्याणी मोठ्याने रडत असतांना देवीचा मंत्र म्हटल्यावर ती शांत होणे : एकदा काही कारणाने कल्याणी मोठ्याने रडू लागली. तेव्हा ती कुणाचेच ऐकत नव्हती. त्या वेळी मी ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चैै ।’ हा मंत्र ११ वेळा म्हटला आणि ती अकस्मात् शांत झाली आणि मी म्हणत असलेला मंत्र ऐकू लागली. सर्वांनाच याचे आश्चर्य वाटले. आताही तिला हा मंत्र पुष्कळ आवडतो.
३. वय – ७ ते ९ वर्षे
३ अ. धर्माचरणाची आवड : कल्याणीला धर्माचरणाची आवड असून तिला कुंकू लावायला आणि बांगड्या घालायला मनापासून आवडते. ती शाळेतल्या मैत्रिणींनाही कुंकू लावण्यास सांगते.
३ आ. कल्याणीने अल्पावधीतच कथ्थक नृत्य शिकून प्रथम परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणे : कल्याणीला नृत्याची आवड आहे. देवाची गाणी लावली की, तिला आपोआप सात्त्विक कृती सुचतात. त्यामुळे तिला ‘शास्त्रीय नृत्य शिकवावे’, अशी माझी इच्छा होती. तिला कथ्थक नृत्याच्या वर्गाला घातल्यावर अल्पावधीतच ती सर्व शिकली आणि प्रथम परीक्षेत पहिला क्रमांक मिळवून बाईंच्या कौतुकाला पात्र झाली.’
४. स्वभावदोष आणि अयोग्य कृती
हट्टीपणा करणे, मोठ्यांचे न ऐकणे, दंगा करणे आणि भ्रमणभाषवर चलत्चित्रे (व्हिडिओ) पहाण्यात वेळ वाया घालवणे.
‘हे गुरुदेवा, कल्याणीला तुम्ही तुमच्या चरणांशी ठेवा. ‘आमच्या सर्वांचा उद्धार करा’, अशी तुमच्या चरणी शरणागत होऊन प्रार्थना करते.’
– श्रीमती जयश्री मुळे (कु. कल्याणीस्वरूपाची आजी) (सर्व सूत्रांचा दिनांक ९.५.२०१९)
रामनाथी आश्रमात आल्यावर साधकांच्या लक्षात आलेले कु. कल्याणीस्वरूपा मुळे हिचे स्वभावदोष आणि अहंचे पैलू
कल्याणीस्वरूपामध्ये अव्यवस्थितपणा, आळशीपणा, मनाने करणे, अप्रामाणिकपणा आणि उद्धटपणा हे स्वभावदोष अन् अहंचे पैलू असल्याचे आश्रमातील साधकांच्या लक्षात आले. हे स्वभावदोष अन् अहंचे पैलू दूर करण्यासाठी तिने प्रयत्न केल्यास तिच्या आध्यात्मिक प्रगतीतील अडथळे दूर होऊन तिची प्रगती होऊ लागेल !
– रामनाथी आश्रमातील साधक (९.१०.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |