धर्मनगर (त्रिपुरा) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

  • हिंदूंची घरे, दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ !

  • २ ठिकाणी कलम १४४ लागू

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण झाल्यावर हिंदू कायदेशीर कारवाईची मागणी करतात, तर अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळावर आक्रमण झाल्यास ते त्वरित कायदा हातात घेऊन प्रत्युत्तर देतात ! – संपादक

धर्मनगर (त्रिपुरा) – त्रिपुरा राज्याच्या धर्मनगर उपविभागातील रोवा बाजार येथे विश्‍व हिंदु परिषदेने मोर्च्याचे आयोजन केले होते. तेव्हा जमावाकडून येथे एका मशिदीवर आक्रमण करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून कदमतला येथे १ सहस्र धर्मांध रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हिंदूंची घरे, दुकाने आणि वाहने यांवर आक्रमणे केली. याला प्रत्युत्तर म्हणून जमावाने येथील मशिदीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, जो धर्मांधांनी रोखला.

रोवा बाजार येथील मशिदीवर झालेल्या आक्रमणानंतर मुसलमानांनी ठिकठिकाणी निदर्शने केली आणि मुसलमानांना संरक्षण देण्याची मागणी केली. यासाठी कैलाशहर येथील इराणी पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला. यामुळे प्रशासनाकडून धर्मनगर उपविभाग आणि उनोकोटी जिल्ह्यातील कैलाशहर उपविभाग येथे धार्मिक हिंसाचारामुळे कलम १४४ (जमावबंदी) लावण्यात आले आहे. बांगलादेशात हिंदूंवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर येथे हिंदु आणि मुसलमान यांच्या गटांकडून सभा घेण्यात आल्या होत्या.