भारतात मुसलमानांच्या विरोधात काहीही घडले, तरी ‘इस्लाम खतरे में है’ अशी बांग ठोकणारे मुसलमान नेते आणि त्यांच्या संघटना आता त्यांच्या चिनी बांधवांसाठी काही बोलत का नाहीत ? – संपादक
बीजिंग (चीन) – चीनमध्ये आता मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यात येत आहेत. त्या ठिकाणी चिनी पद्धतीने रचना करण्यात येत आहे. चीन सरकारचे म्हणणे आहे, ‘मशिदींवरील प्रतिके ही मध्यपूर्व आशियातील इस्लामीकरणाचा भाग वाटू नये आणि ती अधिक चिनी वाटावीत, यासाठी असे केले आहे.’ नुकतेच चीनमधील पश्चिम क्विनगाई प्रांतातील शिनिंग शहरातील डाँगगुआन मशिदीचे घुमट आणि मिनार हटवण्यात आले आहेत.
चीनने देशातील मशिदींमधून इस्लामी वास्तूकलांची प्रतिके, उदा. घुमट आणि मिनार वर्ष १९९० च्या दशकापासूनच हटवण्यास चालू केले होते. प्रथम मशिदींजवळील लोकांना हटवले. नंतर तेथील वास्तूशिल्प पालटण्यास आरंभ केला. राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या काळात हा प्रकार आणखीनच वाढला. जिनपिंग यांनी या मोहिमेला ‘सांस्कृतिक एकीकरण’ असे नाव देत इतर धर्मांच्या संस्कृतींची प्रतिके हटवणे चालू केले आहे.