(म्हणे) ‘हिंदूंनो, मर्यादेत रहा, अखिलेश यादवला (निवडून) येऊ द्या, सर्व आत (कारागृहात) जाल !’

  • उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते अदनान खान यांची हिंदूंना धमकी

  • ‘तुमच्या स्त्रिया आमच्या ‘हरम’चा (जनानखान्याचा) भाग होत्या, दासी होत्या !’, असेही आक्षेपार्ह आणि वासनांध विधान !

हिंदू संघटित नसल्यामुळेच धर्मांध नेत्यांचे हिंदूंना अशा प्रकारे धमकी देण्याचे धाडस होते. आज धमकी देणारे उद्या तुमच्या मुळावर उठतील. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आताच प्रयत्न करा ! – संपादक 

लक्ष्मणपुरी – समाजवादी पक्षाचे उत्तरप्रदेशातील एका युवा शाखेचे नेते अदनान खान यांची ‘फेसबूक’वरून एक आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित झाली आहे. यात त्यांनी ‘हिंदूंनी मर्यादेत रहावे अन्यथा अखिलेश यादव यांची सत्ता आल्यावर (तुम्ही) सर्व आत (कारागृहात) जाल. तेव्हा योगी (उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) घंटी वाजवत असेल. समाजवाद जिंदाबाद, अखिलेश यादव जिंदाबाद !’, अशी धमकी दिली आहे. तसेच ‘हिंदु स्त्रिया आमच्या ‘हरम’चा (जनानखान्याचा) एक भाग होत्या, दासी होत्या. जनावरांचे पूजन करणारे जनावरच रहातील’, अशा अश्लाघ्य भाषेमध्ये हिंदु महिला आणि हिंदु धर्म यांचा अवमान केला आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी अदनान खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्यांना अटक केली आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी जवळीक असलेले अदनान खान समाजवादी पक्षाचा टांडा विधानसभा क्षेत्रातील युवा शाखेचे अध्यक्ष आहेत. (अखिलेश यादव यांनी या प्रकरणात बाळगलेले मौन त्यांच्यातील हिंदुद्रोहच स्पष्ट करतो ! – संपादक)

प्रकरण अंगाशी आल्यावर अदनान खान यांच्याकडून सारवासारव !

प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसल्यावर अदनान यांनी ही ‘पोस्ट’ लिहिल्याचे नाकारले. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना सांगितले, ‘माझे ‘फेसबूक’ खाते ‘हॅक’ झाले होते (अन्यांनी नियंत्रण मिळवले होते). दुसर्‍यानेच माझे खाते वापरून ही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. त्रास झाल्याविषयी मला खेद आहे. यापुढे असे होणार नाही.’’ (हास्यास्पद स्पष्टीकरण देऊन सारवासारव करणारे हिंदुद्वेष्टे अदनान खान ! – संपादक)