‘आम्ही काही दिवस आर्थिक संकटात होतो. त्या वेळी मी ‘धनाची व्यवस्था कशी होईल ?’, याचा विचार करत होतो. आम्ही मार्च मासात आमची ‘सँट्रो’ ही चारचाकी गाडी विकली. तेव्हा त्या वाहनाचे १ लक्ष २५ सहस्र रुपये मिळाले. त्यांतील १९ सहस्र रुपये येणे बाकी होते. गाडी विकत घेणार्याने ‘पुढील मासात पैसे देतो’, असे वचन दिले होते; परंतु त्याला दळणवळण बंदीमुळे पैसे देणे जमले नाही. आम्ही त्याला त्याविषयी अनेकदा सांगितले, तरी तो पैशांची व्यवस्था करू शकत नव्हता. तेव्हा आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने प्रार्थना केली आणि १ – २ दिवसांत त्या व्यक्तीने उरलेले पैसे आणून दिले. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. अभिषेक अवस्थी, कानपूर, उत्तरप्रदेश. (१३.११.२०२०)