कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

सर्वच वाचकांना स्वतःच्या पाल्यांवर संस्कार कसे करावेत ? हे कळण्यासाठी उपयुक्त असलेली लेखमालिका !

‘सनातन प्रभात’मध्ये संतांचा साधनाप्रवास, त्यांची शिकवण यांच्या संदर्भातील लेख नियमित प्रकाशित केले जातात. १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी चालू झालेल्या या लेखमालिकेतून ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत.

१७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आपण प.पू. बाळाजी आठवले यांच्या लिखाणाच्या संदर्भातील वैशिष्ट्ये पाहिली. आज लेखमालिकेचा अंतिम भाग पाहूया.

(भाग ५)

चौथा भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/519514.html

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. दादा आठवले

५. प.पू. दादांचे राष्ट्राच्या संदर्भातील विचार

५ अ. लोकशाही

५ अ १. ‘व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, याचे उत्तर द्या ! : लोकशाहीमध्ये राज्यशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रासंगिक आचारसंहितेला अनुसरून आपण वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध घालतोच ना ? नागरिकाला स्वतःच्या प्रगतीची प्रेरणा देणारे स्वातंत्र्य आणि नियम यांच्या कार्यवाहीत कुठली मूलभूत विसंगती आहे का ?

५ अ २. निवडणुकांना महत्त्व देणार्‍यांनो, हे लक्षात घ्या ! : सहस्रो मूर्खांच्या मतापेक्षा एका विद्वान माणसाचे मत अधिक उपयुक्त असते.

५ आ. नागरिकांना देशाप्रती प्रेम आणि आदर वाटतो, तेव्हाच देश बलवान होतो ! : व्यक्ती आत्मकेंद्रित होते आणि तिला देशकल्याणाची काळजी वाटत नाही, तेव्हा समाज अन् देश यांचे मूल्य किंवा गुणवत्ता अल्प होते. स्वार्थ वाढल्यावर लोक आपापसात भांडू लागतात. लोक निःस्वार्थी झाले आणि त्यांच्यात देशाप्रती आत्यंतिक प्रेम निर्माण झाले, तर ते एक होतात अन् देश कणखर आणि बलवान होतो.

५ इ. प्रत्येकाने स्वार्थ सोडून समाज आणि देश यांप्रती आपले कर्तव्य पूर्ण करणे आवश्यक ! : आपल्या देशभक्तांच्या स्वार्थत्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. ‘आपल्या पिढीने दास्यत्वात अडकू नये’, असे वाटत असल्यास आपल्यातील प्रत्येकाने समाज आणि देश यांप्रती आपले कर्तव्य म्हणून काहीतरी निःस्वार्थीपणे केले पाहिजे. प्रत्येक जण भ्रष्टाचार करू लागला, लाच घेऊ लागला आणि स्वार्थापोटी समाजाला लुटू लागला, तर लवकरच समाजाची अधोगती होऊन तो नष्ट होईल.

५ ई. वडिलांनी मुलाला सैन्यात जाण्यास नकार देऊ नये, यासाठी त्यांच्या नकळत सैन्यात भरती होऊन त्याविषयी त्यांना पत्राने कळवणारा देशभक्त मुलगा ! : गोवा स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी एका तरुण मुलाने स्वतःच्या वडिलांना पुढील पत्र लिहिले. ‘बाबा, गोवा तुम्हाला पुष्कळ आवडते आणि गोव्यावर तुमचे प्रेम आहे. त्या गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी मी आज सैन्यात भरती होत आहे; मात्र मी हे तुमच्या नकळत करत आहे. माझ्याप्रती असलेल्या तुमच्या अगाध प्रेमाची मला जाणीव आहे. माझ्या पत्रामुळे तुमचे मन विषण्ण आणि दुःखी होईल; परंतु ‘दुसर्‍याच्या मुलाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलीदान करावे’, असा विचार प्रत्येक वडिलांनी केला, तर देश स्वतंत्र कसा होणार ?’

५ उ. सर्व मुले लढाईत मारली जाऊनही ‘देशाला अर्पण करण्यास मुलगा नाही’, याची खंत वाटणारी वीरमाता !

एका मातेचे पाचही पुत्र पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत मृत्यूमुखी पडले. तिचे शेजारी आणि देशाचे नेते तिच्या सांत्वनासाठी आले. त्या वेळी रडत रडत ती त्यांना म्हणाली, ‘‘लढाईमध्ये माझ्या पाचही मुलांचा मृत्यू झाला, याचे मला दुःख वाटत नाही; मात्र देशासाठी आणखी एक मुलगा अर्पण करू शकत नाही, याचे मला दुःख आहे.’’ (खंड ३)

६. प.पू. दादांनी केलेल्या कविता

६ अ. ‘संतवाङ्मयात ईश्वर आणि अध्यात्म हाच केंद्रबिंदू असल्यामुळे ते काळाच्या प्रवाहात टिकून रहाते ! : ‘जे न देखे रवि, ते देखे कवी’ म्हणजे ‘जे (अंधकार) रवि (सूर्य) पाहू शकत नाही, ते (माणसाच्या मनातील अंधकार म्हणजे दुःख) कवी पाहू शकतो’, असे म्हटले आहे. कवी अंधकार पाहून आपल्या काव्याद्वारे तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. अज्ञान हेच खर्‍या अर्थाने अंधकाराचे मूळ आहे आणि केवळ खर्‍या ज्ञानामुळेच (अध्यात्मामुळेच) तो दूर होऊ शकतो, हे संत कवी जाणतात. सर्वसाधारण कवी आणि संत कवी यांत हाच भेद आहे. आजवरचा इतिहास पाहिल्यास वाङ्मय तात्कालिक सुख देते, तर संतवाङ्मय हे चिरंतन सुख (आनंद) देते. संतवाङ्मय केवळ आशयघनच नव्हे, तर चैतन्यमय असल्याने इतर वाङ्मयापेक्षा त्यात कितीतरी अधिक पटींनी शक्ती असते. तसेच ईश्वर आणि अध्यात्म हाच त्याचा केंद्रबिंदू असल्यामुळे ते काळाच्या प्रवाहात टिकून रहाते.

६ आ. प.पू. दादांचे कवितांच्या माध्यमातून दिसून येणारे भाषाप्रभुत्व : भाषेची श्रीमंती मुख्यतः विचारधन आणि शब्दसंपत्ती यांवर अवलंबून असते. प.पू. दादांच्या विलक्षण प्रज्ञाशक्तीचे प्रतीक असलेल्या या काव्यरचना आहेत. यांवरून त्यांचे भाषाप्रभुत्वही दिसून येते. प.पू. दादांची अंतःस्फूर्ती जागृत होऊन त्यांनी ही काव्ये केली आहेत आणि त्यांचा अध्यात्म हाच केंद्रबिंदू आहे. या काव्यातील आरंभीची आणि / किंवा शेवटची अक्षरे यांवरून व्यक्तीचे नाव सिद्ध होते. प.पू. दादांच्या कवितांची भाषा अत्यंत सरळ आणि रसाळ आहे. यापेक्षाही या कवितांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कविता आध्यात्मिक विषयाशी संबंधित असून त्या बोधप्रद अन् उपदेशपरही आहेत.

६ इ. प.पू. दादांच्या या काव्यातील विविध विषय : एखाद्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये सांगण्यासोबतच प्रोत्साहन देणारे, ‘मायेत न गुंतता आदर्श जीवन कसे जगावे ?’, याची शिकवण देणारे, कुटुंबियांना मार्गदर्शन करणारे, असे विविध पैलू प.पू. दादांनी या काव्यांद्वारे मांडले आहेत. या समवेतच गुरूंविषयी भक्तीभाव दर्शवणारी आणि संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारीही काव्ये आहेत. प.पू. दादांनी कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग या तिन्ही योगमार्गांनुसार साधना केली असल्यामुळे त्यांचा अद्भुत संगमही त्यांच्या काव्यातून दिसून येतो.

विविध नावे सिद्ध होणार्‍या यातील कविता आपली मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना वाढदिवसाला शुभेच्छापत्ररूपाने देता येतील. त्या कवितांवरून ‘निराळ्या नावाच्या कविता कशा करायच्या ?’, हेही लक्षात येईल.

६ ई. कवितांची वैशिष्ट्ये : एखाद्याचा वाढदिवस किंवा महत्त्वाचा दिवस, अशा विशेष प्रसंगी दादा कविता करून त्या त्या व्यक्तीला भेट म्हणून देत. या कवितांचे वैशिष्ट्य असे की, बहुतेक कवितांतील प्रत्येक ओळीतील पहिल्या अक्षरांनी त्या व्यक्तीचे नाव बनत असे. कधी पहिल्याबरोबरच शेवटच्या अक्षरांनीही एखादे नाव बनत असे. कधी एक-आड-एक ओळीतील पहिल्या अक्षराने व्यक्तीचे नाव सिद्ध होत असे; मात्र प.पू. दादांच्या काव्यलेखनाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काही कवितांमध्ये एक-आड-एक ओळींतील पहिल्या आणि शेवटच्या अक्षरांनी व्यक्तीचे नाव सिद्ध होत असे. सर्व कविता मार्गदर्शनपर असत. दादांच्या कवितांची वैशिष्ट्ये दर्शवणार्‍या मराठी भाषेतील कविता या ग्रंथात दिल्या आहेत. तशाच त्यांनी इंग्रजी भाषेतही कविता केल्या आहेत. इंग्रजी कविता ‘Poetry arising out of Names’ या इंग्रजी ग्रंथात दिल्या आहेत.

१. सर्वच कविता व्यावहारिक किंवा आध्यात्मिक शिकवण देणार्‍या आहेत.

२. ते एखाद्याच्या नावावरून मराठी अन् इंग्रजी दोन्ही भाषांत कविता करायचे.

३. प.पू. दादा एकाच अर्थाच्या कविता विविध नावांच्या आद्याक्षरांवरून बनवायचे.

४. A ते Z या अक्षरांवरून बनणार्‍या ओळी आणि शब्द त्यांनी सिद्ध केले. कुणावर कविता करायची असल्यास त्याच्या गुणधर्मानुसार शब्द घेऊन ते कविता करायचे.

५. त्यांनी जवळजवळ २० वर्षे कविता केल्या.

६. एकेका नावावर त्यांनी ८ ते ३० कविताही केल्या आहेत.

७. कवितांतील ओळी ८ ते १५ शब्दांच्या आहेत.

८. काही कवितांत व्यक्तीचे नाव, तर काही कवितांत व्यक्तीचे आणि तिच्या पत्नीचे किंवा पतीचे पहिले नाव आहे.

९. दादा घरातील मोलकरीण, अप्पांकडील शिपाई यांनाही कविता करून द्यायचे.

१०. संतांवर कविता – प.पू. भक्तराज महाराज, प.पू. अण्णा करंदीकर, प.पू. काणे महाराज, प.पू. क्षीरसागर महाराज, पू. मलंगशहाबाबा, पू. नरेशबाबा आणि पू. भगतबाबा यांच्यावरही त्यांनी कविता केल्या आहेत.

११. एखादी कविता संतांविषयी असेल, तर हिंदूला कविता देतांना ‘संत’, तर ख्रिस्तीला कविता देतांना ते ‘फादर’ किंवा ‘बिशप’ असा उल्लेख करत.

१२. कवितेच्या तीन वह्या – प्रत्येक वहीत कुणाच्या नावाच्या कविता आहेत, याची अनुक्रमणिका आहे. त्याच नावाची कविता दुसर्‍या वहीत असल्यास तिचा संदर्भ दोन्ही वह्यांत दिला आहे.

१३. दादा एकच विषय निरनिराळ्या शब्दांत लिहायचे, उदा. ‘बँकेचा चेक’, ‘नाम’

१४. दादा प्रथम राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये आणि नंतर आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक होते. त्यांनी दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांवर ते सेवानिवृत्त झाल्यावर इंग्रजीतून कविता केल्या होत्या.

१५. नावाच्या आद्याक्षरांवरून केलेल्या लिखाणातून दिलेल्या संदेशातून व्यक्तीला अंतर्मुख करणे : दादांनी व्यक्तीच्या नावातील अक्षरांनुसार कविता केल्या आहेत. या कविता मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून आहेत. काही वेळा त्यांनी कवितांमध्ये नावांची आद्याक्षरे आरंभी आणि शेवटी येतील, अशीही वैशिष्ट्यपूर्ण रचना केली आहे. या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे या केवळ वाचण्यास सुखदायक नसून त्यातून दिलेला संदेश व्यक्तीला अंतर्मुख करणारा आहे. प्रत्येक कवितेत जीवन, साधना इत्यादी संदर्भात मार्गदर्शन आहे.

६ उ. एकाच अक्षराने आरंभ होणार्‍या आणि अंत्याक्षर एकच असणार्‍या कविता

६ उ १. वैशिष्ट्य : दोन्ही ओळींचे पहिले अक्षर ‘सं’ असे आहे.

संसारतीर तरण्या नसे पैसा जरी ।

संत सन्मार्गाने मोक्षास फुकट नेती ।।

६ उ २. वैशिष्ट्य : दोन्ही ओळींचे शेवटचे अक्षर ‘त’ असे आहे.

क्षीरसागरी डुबी मारता भेटे भगवं

तसेच लाभले सद्गुरु क्षीरसागर सं ।।

६ ऊ. मराठी कवितांसाठी विविध अक्षरांनी आरंभ होणार्‍या शब्दांची काही उदाहरणे

: ल्प, क्रिय

: र्म, री

अन् गो : ती, जानन, गोपाळ, गोपी

क्ष : क्षराचे अक्षर करतो अ

६ ऊ १. मराठी कवितांसाठी विविध अक्षरांनी आरंभ होणार्‍या काव्यपंक्तींची काही उदाहरणे

१. लभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणता वाचे ।

२. रे मना केशव ध्यानीं तरी केशवच होसी ।

१. विसर न पडो देवा हेची माझी विनंती तुला ।

२. विठ्ठल नावाड्या भवसिंधु तारण्या ।

१. तैसा भेटे नारायण सत्संगे ।

२. त्याच्या नामा कधी सोडू नका ।

: देव सदा त्याच्याशी ।

: निर्जिवा चेतना आणावया । (१ ते ४)

‘ळ’ अक्षरावरून शब्द नसल्यामुळे तो वापरण्यासाठी प.पू. दादांनी योजलेली युक्ती – अक्षर गौ-ण मध्ये लिहा पहा गौण झाली ।

(समाप्त)

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (११.९.२०२१)

‘आदर्श आई-वडील कसे व्हायचे ? हे शिकवणारी ‘सुगम अध्यात्मशास्त्र’ ग्रंथमालिका

‘या लेखमालिकेतील सर्व लिखाण सनातनच्या ‘सुगम अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतून संक्षिप्त स्वरूपात घेतले आहे. लेखातील एखादे सूत्र वाचकांना सविस्तर वाचावयाचे असल्यास ‘ते कोणत्या ग्रंथातून घेतले आहे ?’, हे कळण्यासाठी प्रत्येक सूत्राच्या शेवटी कंसात त्याचा खंड क्रमांक दिला आहे.

‘सुगम अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांमध्ये ‘दैवी गुणसंपन्नता आणि आध्यात्मिदृष्ट्या उन्नत अशा कुटुंबाला जन्म देणार्‍या वडिलांनी कोणती शिकवण दिली असेल ?’, याची माहिती मिळते. यातून वाचकांना ‘आदर्श आई-वडील कसे व्हायचे ? आई-वडील म्हणून साधनेची विविध अंगे कोणती ?’, हेही कळेल. असे मौलिक ज्ञान असणार्‍या ग्रंथांचे केवळ वाचन नव्हे, तर त्यातील सूत्रे आत्मसात करून त्याप्रमाणे कृती केल्यास त्यांचे कुटुंबही सात्त्विक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.९.२०२१)

आद्याक्षरांवरून संतांचे नाव सिद्ध होणार्‍या कविता

भक्तराज महाराज आणि बा.वा. आठवले सेवक (बाळाजी वासुदेव आठवले)

(डावीकडील उभ्या रेषेतील ठळक अक्षरे ‘भक्तराज महाराज’ हे नाव आणि उजवीकडील उभ्या रेषेतील ठळक अक्षरे ‘बा.वा. आठवले सेवक’ हे नाव दर्शवतात.)

व दुःखद वाळवंटी या जीवनाच्या । गुरुकृपेचा झरा वाहू दे रे विठोबा ।।

क्वचित् लाभे सद्गुरुसंगती संसारी या । सद्गुरु समागमे आत्मोन्नती घडवा ।।

डफडतो मी लाटांत भवसागराच्या । त्यांतून मुक्त करण्या गुरुराया या ।।

राजवैद्य जगी सुप्रसिद्ध भक्तराज । त्यांनी बनविले नामरसायन मो ।।

न्ममरण टाळण्या भक्तांच्या मुखांत । घालती ते रसायन येई त्यांना की ।।

द मोहादि विकार माझ्या मनाचे । निवारण्या माझ्या नेत्री बोधांजन घातले ।।

हार भक्तीसुमनांचा मी गुरुसी स्वहस्ते । घालून गुरुचरणी मस्तक ठेवितसे ।।

राबती ते भक्तांना तारण्या रात्रंदिन । सबीज मंत्रे एकत्र आणिती जीवशि ।।

न्ममरण टाळण्या रमा संतसेवेत । सद्गुरुसेवा असे मुक्तीचे द्वार ए ।।


भक्तराज महाराज आणि जयंत आठवले भक्त

(डावीकडील उभ्या रेषेतील ठळक अक्षरे ‘भक्तराज महाराज’ हे नाव आणि उजवीकडील उभ्या रेषेतील ठळक अक्षरे ‘जयंत आठवले भक्त’ हे नाव दर्शवतात.)

क्तराजा मजवरि लोटा मायेचा पूर । बुडतो मी भवडोही यांतून वाचवा म ।।

क्वचित लाभे गुरु भक्तांस दाविण्या कोऽहं । यासाठी पार करावे लागे गुणत्रयं ।।

न, मन, धन अर्पावे भक्तराजांस । मग ते दाविती आत्माराम, नको खं ।।

राजवैद्य भक्तराज मजवर कृपा करा । नामरसायन माझ्या मुखी घालण्या या ।।

न्ममरणाचे फेरे चुकविण्या । सोडा माझ्या काम, मद, मत्सराची गा ।।

ला दयाळू भक्तराजा लोटू नका दूर । गुरुदेवा येऊ द्या या बालकाची की ।।

हार भक्तीसुमनांचा मी गुरुसी स्वहस्ते । घालूनी त्यांच्या चरणी मस्तक ठेविले ।।

राबती गुरु भक्तांना तारण्या रात्रंदिन । त्यांचा सबीज मंत्र म्हणण्या करीन आरं ।।

गाच्या कल्याणा देह कष्टविती संत । गुरुचरणाची माती भक्तासी करी मुक्त ।।’ (खंड ४)

प.पू. दादांनी केलेली इंग्रजी कविता

Kill desire not body

(डावीकडील उभ्या रेषेतील ठळक अक्षरे ‘Jayant’ हे नाव दर्शवतात.)

Jayant

Jack told a Saint that a thief always shot

rich men and stole gold.

And so he said “Should I kill him

to save men ? “No” said the Saint.

You should not kill his body,

kill his desire to gain much gold”.

And the Saint gave the thief Divine power

“What you touch will be gold”.

Note ! The thief was hungry. He touched food;

it became gold. He could not eat it.

Then he gave up stealing because

his desire to steal gold was killed.  (इंग्रजी ग्रंथ – ‘Poetry created around Names (Poetry that teaches how to spiritualise worldly life)’)

प. पू. दादा यांचे लिखाण आणि त्यांचे कुटुंबीय यांवर साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

(डावीकडील उभ्या रेषेतील ठळक अक्षरे ‘पू. बाळाजी आठवले’ हे नाव दर्शवतात.)

‘पू. दादांनी जनसामान्यांना दिले अत्यंत अमूल्य भांडार ।

बालकांपासून मोठ्यांपर्यंत काव्यांनी दिला आनंद अपार ।।

‘ळा’ने शब्दाला नसे आरंभ; पण काळात महत्त्व त्याचे फार ।

जीवनाचे सुगम भाषेत ग्रंथाद्वारे शिकवले सार ।।

ध्यात्मिक वारसा जतन आणि संवर्धन केला ।

सवून तो सुगम शैलीने पुढील पिढीला दिला ।।

स्वतःच नव्हे, तर मुलांसाठी उघडले मुक्तीचे द्वार ।

लेखनप्रतिभेला त्या संतपित्याच्या (टीप)

आमचा साष्टांग नमस्कार ।।

टीप – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु डॉ. वसंत आठवले (अप्पा) यांचे प.पू. दादा हे पिता होत.

– श्री. रोहित साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.’ (१६.१०.२०१४) (खंड ४)