परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या लिखाणात नेमकेपणा नसण्याच्या संदर्भातील चुका

‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’

लिखाणात एखाद्या परिस्थितीचे वर्णन जेवढे नेमकेपणाने केलेले असते, तेवढे ते आकलनास सुस्पष्ट होते. वाचकांना तो प्रसंग, परिस्थिती जशीच्या तशी अनुभवता येते. लिखाण जेवढे वस्तूनिष्ठ आणि सुस्पष्ट असेल, तेवढे त्यातील चैतन्य वाढते. बोलीभाषेत वापरल्या जाणार्‍या अनेक संज्ञा परिस्थितीचे वरवर आकलन करून देतात. त्यामुळे साधकांकडून लिखाणातही तसेच संदर्भ लिहिले जातात. परात्पर गुरु डॉ. आठवले प्रसंगाचे नेमकेपणाने; मात्र थोडक्यात वर्णन करण्याकडे कटाक्षाने लक्ष देतात. येथे त्यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांकडून झालेल्या काही चुका उदाहरणादाखल देत आहे.

– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (१४.१०.२०२१)