कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार सी.एम्. इब्राहिम यांची मागणी
तुमकूरु (कर्नाटक) – ‘चाणक्य विश्वविद्यालय’ स्थापन करण्यास आमचा विरोध नाही; परंतु त्याचप्रमाणे ‘टिपू सुलतान विश्वविद्यालय’ही स्थापन करावे, अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य सी.एम्. इब्राहिम यांनी केली. कर्नाटक राज्य सरकारकडून चाणक्य विश्वविद्यालय स्थापन करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर इब्राहिम बोलत होते. काँग्रेसने मात्र ‘चाणक्य विश्वविद्यालया’ला विरोध केला आहे. (काँग्रेस पक्ष एक सांगतो आणि त्याचे आमदार वेगळेच सांगतात ! मुसलमानांना आधी धर्म महत्त्वाचा असतो आणि नंतर पक्ष वगैरे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते ! – संपादक)
१. पत्रकारांशी बोलतांना इब्राहिम म्हणाले की, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांकांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. काँग्रेसने मुसलमान समुदायातून व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून घोषित करावे. ‘पुढच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ३० मास मुसलमान समुदायातील व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्यात येईल’, अशी घोषणा पक्षाने करावी. (धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या आधारे मुख्यमंत्रीपद मागणारे धर्मांध लोकप्रतिनिधी ! ‘काश्मीर आणि पंजाब या राज्यांत हिंदु मुख्यमंत्री बनवण्यात येईल’, अशी घोषणा कधी काँग्रेसने केली होती का ? इब्राहिम अशी घोषणा करण्याची मागणी कधी करतील का ? – संपादक)
२. इब्राहिम काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्याविषयी म्हणाले की, चाणक्य विश्वविद्यालय स्थापन करायला नको’, असे म्हणणार्या सिद्धरामय्या यांच्याविषयी मी काही बोलणार नाही. ते मोठे आहेत. सिद्धरामय्या हे राजकारणासाठी टिपू सुलतान याची जयंती साजरी करत होते. आम्ही तेव्हाही टिपू सुलतानच्या जयंतीला विरोध केला होता. जयंती साजरी करणे, तसेच चित्राला हार घालून पूजा करणे, या पद्धती आमच्यात नाही. (मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेसमधील हिंदु नेत्यांना घरचा अहेर ! या नेत्यांना आता तरी शहापणा येईल का ? – संपादक)