परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण कधी सोडू नका ।

‘लहानपणीचा काळ कधी निघून गेला, हे कळलेही नाही. संसारात पडल्यावर एक-एक दिवस घालवणे कठीण झाले. वयाच्या ४३ व्या वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर त्यांचा सत्संग आणि त्यांची अपार कृपा यांमुळे त्यानंतरची ३२ वर्षे आनंदात कधी गेली, हे मला कळलेच नाही. पूर्वी मला वाढदिवस, त्याचे महत्त्व इत्यादींविषयी ठाऊक नव्हते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आयुष्याच्या कालगणनेचे महत्त्व कळले. वयाच्या ४३ ते ७५ व्या वर्षांपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी मला चैतन्यामृत दिले. ‘हाच माझा अमृत महोत्सव आहे’, असे मला वाटते. मी माझे अनुभव परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले

लहानपणीचा काळ खेळण्या बागडण्याचा ।
संसाराचा काळ सुख-दुःख झेलण्याचा ।
मनुष्यजन्माचा काळ अती मोलाचा ।
साधना करूनी गुरुकृपेने मोक्षप्राप्ती करण्याचा ।। १ ।।

पश्चात्ताप करत भूतकाळात रमू नका ।
चिंता करत भविष्याचा विचार करू नका ।
वर्तमानकाळातील आनंदाला मुकू नका ।
आपत्काळी भक्ती वाढवल्याविना राहू नका ।। २ ।।

मायेच्या विळख्यात सापडू नका ।
साधनेचा मार्ग कुणी सोडू नका ।
साधकांवर प्रीती केल्याविना राहू नका ।
चुका करणार्‍यांना शिक्षा दिल्याविना सोडू नका ।। ३ ।।

मनुष्यजन्म वाया घालवू नका ।
शिकणे नि शिष्यपद सोडू नका ।
चैतन्याला कधीच विन्मुख होऊ नका ।
गुरुकृपायोगाचा विहंगम् मार्ग सोडू नका ।। ४ ।।

वयाची पंचाहत्तरी मी गाठली ।
विनवितो साधकांसी मी हात जोडूनी ।
माझ्या अभिवादनासाठी वेळ घालवू नका ।
परम पूज्यांचे चरण (टीप १) कधीच सोडू नका ।। ५ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरुचरण

(पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.५.२०२१)