लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

बिजनौर (उत्तरप्रदेश) मध्ये धर्मांधाने महिलेला ट्रकखाली चिरडले उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहाद !

देशात प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे समाजाच्या सुरक्षितेसाठी राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करणे आवश्यक आहे !

बिजनौर (उत्तरप्रदेश) – नफीस अहमद या धर्मांधाने एका शीख महिलेला लोखंडी सळीने घायाळ केले. त्यानंतर तिला ट्रकखाली फेकून चिरडून ठार मारले. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कारागृहामध्ये रवानगी केली आहे.

येथील अफजलगमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४ वर एका महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांच्या अन्वेषणामध्ये ती महिला शीख असल्याचे समोर आले होते. माध्यमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ८ वर्षांपूर्वी त्या महिलेचे उत्तराखंडच्या भिकमपुरी येथील एका शीख व्यावसायिकाशी लग्न झाले होते. त्यांना एक ५ वर्षांची मुलगी आहे. वर्ष २०१८ मध्ये त्या शीख महिलेची बिजनौरच्या मनियावाला येथे रहाणार्‍या २६ वर्षांच्या नफीस अहमद या ट्रकचालकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्या महिलेने पतीला सोडले होते. नफीसने पोलिसांना सांगितले की, ती महिला त्याला लग्न करण्यासाठी आग्रह करत होती. त्यामुळे त्याने ट्रकच्या केबिनमध्ये बसून त्या महिलेला भरपूर मद्य पाजले. दारूच्या नशेत तिच्या डोक्यावर लोखंडी सळीने मारहाण केली. त्यानंतर तिला ट्रकच्या खाली फेकले आणि तिच्यावरून ट्रक नेला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले. त्या महिलेच्या हत्येनंतर तिच्या आधीच्या पतीने नफीस अहमदच्या विरोधात पोलीस तक्रार प्रविष्ट केली होती. नफीसला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांसमोर गुन्हा मान्य केला. त्याच्याकडून मृत महिलेचे आधारकार्ड, भ्रमणभाषसंच, हत्येसाठी वापरलेली लोखंडी सळी आणि ट्रक कह्यात घेतला आहे.

 

करीमने ‘करण जाधव’ नावाने मैत्री करून युवतीवर ११ दिवस बलात्कार केला !

बडवानी (मध्यप्रदेश) मध्ये ‘लव्ह जिहाद’ !

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करूनही जर अशी प्रकरणे थांबत नसेल, तर ती प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फासावर लटकवले पाहिजे आणि आरोपीची संपत्ती जप्त करून पीडितेला लक्षावधी रुपये हानीभरपाई म्हणून दिले पाहिजे !

भोपाळ – मध्यप्रदेशच्या बडवानी जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. करीम या धर्मांधाने ‘करण जाधव’ असे खोटे नाव सांगून एका दलित युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर सतत ११ दिवस बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार, ॲट्रासिटी ॲक्ट आणि लव्ह जिहाद या कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

बडवानी जिल्ह्यातील पानसेमल पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्‍या एका गावामध्ये आरोपी आणि पीडित युवती दोघेही रहातात. २२ वर्षीय पीडित युवती पानसेमल येथे एका महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या द्वितीय वर्गाला शिकते. काही दिवसांपूर्वी दोघांची मैत्री झाली होती. त्या वेळी करीमने त्याने नाव ‘करण जाधव’ असल्याचे सांगून पीडितेशी ओळख वाढवली. त्यानंतर करीम पीडितेला फूस लावून इंदूर येथे घेऊन गेला. तेथे तिच्यावर ११ दिवस बलात्कार केला. तेथून परत येत असतांना पीडितेला आरोपीची खरी ओळख समजली. तेव्हा त्याने तिला निवाली येथे सोडून दिले. याविषयी तिने तिच्या आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.

 

झालवाड (राजस्थान) मध्ये धर्मांधाकडून दलित युवतीची हत्या

राजस्थानमध्ये ‘लव्ह जिहाद’ !

या हत्येलाही धर्मनिरपेक्ष राजकारणी आणि माध्यमे एक अयशस्वी प्रेमप्रकरण सांगून दुर्लक्ष करतील किंवा आरोपीला मनोरुग्ण ठरवतील. त्यानंतर पुन्हा दुसर्‍या मुली धर्मांधांच्या धारदार शस्त्राला बळी पडतील. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे !

झालवाड (राजस्थान) – पिडावा भागातील बाकीपूर येथे जुबैर खान याने एका १९ वर्षीय दलित युवतीची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून तेथे मोठ्या प्रमाणात पोलीसदल तैनात करण्यात आले आहे.

पीडितेच्या नातेवाइकांच्या मते जुबैर खान पीडितेच्या मागे लागला होता. तिचा विवाह दुसरीकडे निश्चित झाला होता. त्यामुळे नातेवाइकांनी सांगितल्याप्रमाणे पीडितेने आरोपीशी बोलणे थांबवले होते. एकदा पीडित युवती आणि आरोपीचे नातेवाइक यांच्यात वादही झाला होता; परंतु तडजोड केल्याने तो थांबला होता. पोलिसांच्या माहितीप्रमाणे पीडित युवती गावातील काही माहिलांसवेत सोयाबीनचे पीक तोडण्यासाठी गेली होती. तेथून ती शौचालयासाठी बाहेर पडली असता आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण केले. पुष्कळ वेळानंतरही ती परत आली नसल्यामुळे तिचा शोध घेण्यात आला. तेव्हा ती एका शेतात मृतावस्थेत पडलेली दिसली.

 

ख्रिस्ती तरुणाने हिंदु नावाने मुलीशी लग्न करून फसवले !

आतापर्यंत हिंदु मुली धर्मांध तरुणांना बळी पडत होत्या. आता ख्रिस्ती तरुणही त्यांची फसवणूक करू लागल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे बहुसंख्य हिंदु मुलींच्या रक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन कठोर उपाययोजना करणे अपेक्षित आहे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

भोपाळ (मध्यप्रदेश) – भोपाळमधील कोहेफिझा भागात एका ख्रिस्ती तरुणाने हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. ती मुलगी गर्भवती झाल्यानंतर स्वतः हिंदु असल्याचे सांगून आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केले. जेव्हा या मुलीने एका मुलाला जन्म दिला, तेव्हा त्या तरुणाने ‘तो ख्रिस्ती असून तिलाही त्याच धर्माचे पालन करावे लागेल’, असे सांगितले. एवढेच नाही, तर नवजात मुलाला येशू ख्रिस्ताच्या सेवेत ठेवण्यासाठी दबाव निर्माण केला. मुलीने धर्मांतर करण्यास आणि मुलाला देण्यास नकार दिला. त्यामुळे ख्रिस्ती तरुणाने तिला घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी कोहेफिझा पोलिसांनी आरोपी आणि त्याची बहिण यांच्या विरोधात ‘मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम- २०२०’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोहेफिझा पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे येथे एका २६ वर्षीय तरुणीची अनुमाने वर्षभरापूर्वी सामाजिक माध्यमातून संजय सिंह याच्याशी मैत्री झाली होती. संजयने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. या काळात संजयने लग्नाच्या बहाण्याने मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलगी गर्भवती झाल्याने तिने संजयवर लग्न करण्यासाठी दबाव निर्माण केला. त्यानंतर आरोपीने हिंदु असल्याचे सांगत १४ जानेवारी २०२१ या दिवशी आर्य समाज मंदिरात लग्न केले. काही मासांनी तिने बाळाला जन्म दिला. तेव्हा त्याने मुलीला सांगितले की, ‘तो हिंदु नसून ख्रिस्ती आहे आणि त्याचे खरे नाव ‘संजय मसीह’ आहे. त्यामुळे तिलाही ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल.’ यासाठी त्याची बहीण सोनल हिचाही त्याला पाठिंबा होता. ही घटना उघडकीस आल्यापासून दोघेही बहिण-भाऊ पसार आहेत.