हिंदु धर्माला कनिष्ठ संबोधून, तसेच त्याविषयी अपप्रचार करून हिंदु समाजाला हिणवण्याचा प्रकार विरोधक पूर्वीपासूनच करत आलेले आहेत. आताही एका षड्यंत्राद्वारे प्रसारमाध्यमे आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना धरून हा प्रयत्न चालूच आहे; मात्र हिंदू याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहेत. हिंदु संस्कृती आणि सभ्यता सर्वांत पुरातन असून काळाच्या ओघात ती अजूनही टिकून आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी आता वैचारिकदृष्ट्या सुस्पष्ट भूमिका घेऊन आपल्या धर्माविषयी ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे.