परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक संशोधन केंद्रात रहाणार्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांमध्ये कुटुंबभावना निर्माण न झाल्याची करून दिलेली जाणीव !
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना सत्संग लाभला. त्या वेळी झालेल्या सत्संगात साधकांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, ‘‘येथे (आध्यात्मिक संशोधन केंद्रात) रहाणार्या साधकांनी स्वतःत कुटुंबभावना किंवा बंधुत्व निर्माण केले नाही. आपल्याला तर संपूर्ण जगात अध्यात्माचा प्रसार करून अधिकाधिक साधक निर्माण करायचे आहेत. तुम्हाला आश्रमात रहाणार्या साधकांनाही एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही. तुम्ही केवळ एखाद्या शेजार्याप्रमाणे एकमेकांशी (तुटक) वागत आहात, तर देश-विदेशांत असणार्या साधकांविषयी तुम्हाला कशी जवळीक वाटेल ?’’ – (पू.) देयान ग्लेश्चिच, आध्यात्मिक संशोधन केंद्र, रामनाथी, गोवा.