नाशिक येथे ॲक्सिस बँकेतील व्यवस्थापकाने ग्राहकांचे १३ लाख ८० सहस्र रुपये हडपले !

ग्राहकाची पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार, गुन्हा नोंद !

ॲक्सिस बँक

नाशिक – ॲक्सिस बँकेतील व्यवस्थापक अमित कुलकर्णी यांनी अधिक व्याजाचे आमीष दाखवून ग्राहक राजेंद्र जाधव यांचे १३ लाख ८० सहस्र रुपये हडपल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आडगाव येथील राजेंद्र जाधव यांचे ॲक्सिस बँकेत खाते आहे. त्यांच्या खात्यावर मोठी रक्कम होती. याची माहिती अधिकोषाचे व्यवस्थापक अमित कुलकर्णी यांना होती. त्यांनी राजेंद्र जाधव यांना अधिकोषापेक्षा अधिक व्याजाचे आमीष दाखवले. त्यासाठी त्यांच्या खात्यातील रक्कम दुसरीकडे गुंतवण्याचा उपदेश दिला. त्यासाठी जाधव यांच्याकडून त्यांनी त्यांच्या स्वाक्षरीचे धनादेश घेतले. जाधव आणि त्यांची पत्नी यांच्या नावावरून त्यांनी वेळोवेळी १३ लाख ८० सहस्र ३०० रुपये काढून घेतले; मात्र नंतर कुलकर्णी यांनी जाधव यांना पुन्हा पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जाधव यांचे व्याज तर बुडालेच, समवेत अधिकोषातील बचत म्हणून ठेवलेली रक्कमही कुलकर्णी यांनी हडपली.