नैनीताल (उत्तराखंड) येथे मुसलमानांकडून अवैधरित्या २३ सहस्र ७६० चौ. फूट भूमी  विकत घेतल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश

(उजवीकडे) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

नैनीताल (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्यामध्ये अवैधरित्या भूमी विकण्याचे प्रकरण समोर आले आहे. गेल्या मासात २३ सप्टेंबर या दिवशी मुसलमानांनी अनुसूचित जाती आणि जमाती समाजातील लोकांकडून २३ सहस्र ७६० चौरस फूट भूमी खरेदी केली होती. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या अनुमतीविना इतकी मोठी भूमी विकत घेता येत नाही. या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. नैनीतालच्या सरना गावामध्ये ही भूमी आहे. उत्तरप्रदेशातील अलीगड आणि संभल जिल्ह्यांतील मुसलमानांनी येथे भूमी घेतली आहे.