काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ९०० हून अधिक धर्मांध नागरिक पोलिसांच्या कह्यात !

  • कधीनव्हे ती पहिल्यांदा पोलिसांनी अशा प्रकारे स्थानिक धर्मांधांना कह्यात घेण्याची कारवाई केली, हे चांगलेच झाले; मात्र हे आधीच करणे अपेक्षित होते ! – संपादक
  • काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट न होण्यामागे तेथील धर्मांध आणि देशद्रोही नागरिकांचे आतंकवाद्यांना असलेले उघड अन् छुपे समर्थनच कारणीभूत आहे. त्यामुळे अशांनाही आतंकवादी ठरवून त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ६ दिवसांत काश्मिरी हिंदु आणि शीख नागरिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यानंतर सुरक्षादलाकडून जवळपास ९०० हून अधिक स्थानिक धर्मांध नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘आतंकवाद्यांप्रती सहानुभूती दाखवली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यातील बहुसंख्य लोक बंदी घालण्यात आलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. हे लोक आतंकवाद्यांच्या ‘ओव्हरग्राऊंड वर्कर्स’ (ओ.जी.डब्ल्यू. – भूमिगत कार्यकर्ते) सूचीमध्ये आहेत. ते आतंकवाद्यांना विविध प्रकारचे साहाय्य करत असतात, उदा. रहाण्यासाठी घर उपलब्ध करून देणे इत्यादी. श्रीनगर, गांदरबल, बडगाम आणि दक्षिण काश्मीरच्या भागांतून या लोकांना कह्यात घेण्यात आले आहे. त्यांची आता चौकशी करण्यात येत आहे.