आमचे सरकार कमकुवत करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये ! – तालिबानची अमेरिकाला अप्रत्यक्ष चेतावणी

फुटकळ तालिबानी बलाढ्य अमेरिकाला चेतावणी देतात आणि अमेरिका गप्प बसते, हे पहाता भारत अन् भारतीय सैन्य यांचे शौर्य आणि महत्त्व अधिक अधोरेखित होते ! – संपादक

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानशी चांगले संबंध असणे, हे सर्वांसाठी चांगले असेल. अफगाणिस्तानमधील सध्याचे सरकार कमकुवत करण्याचे प्रयत्न कुणीही करू नये अन्यथा त्यामुळे संबंधित देशाच्या लोकांसाठी अफगाणिस्तानमध्ये अनेक समस्या निर्माण होतील, अशा शब्दांत तालिबानने अमेरिकेला अप्रत्यक्षपणे चेतावणी दिली. तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतली. त्यानंतर प्रथमच तालिबान आणि अमेरिका यांच्यात ९ ऑक्टोबर या दिवशी कतारची राजधानी दोहा येथे चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी तालिबानचा परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी याने वरील चेतावणी दिली. ‘दोन्ही देशांचे एकमेकांशी चांगले संबंध असतील’, असे आश्‍वासन अमेरिकेकडून दिले जात आहे.