सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ४३ नवीन रुग्ण आढळले, तर ४ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४२१ झाली आहे. सद्य:स्थितीत ९४७ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ६ ऑक्टोबर या दिवशी १०८ जण कोरोनामुक्त झाले.
अडीच लाखांहून अधिक व्यक्तींनी घेतल्या दोन्ही मात्रा
जिल्ह्यात आतापर्यंत १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या सर्व गटांतील एकूण ४ लाख ८१ सहस्र ६२९ जणांनी लसीची पहिली मात्रा (डोस) घेतली आहे, तर २ लाख ५० सहस्र २२० जणांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ३९ सहस्र ५५० लसी उपलब्ध आहेत, तर जिल्ह्याच्या मुख्य साठ्यात ९०० लसी शिल्लक आहेत.