तालिबान सरकारमधील ‘हक्कानी नेटवर्क’चा प्रमुख अनस हक्कानी याचे ट्वीट
तालिबानी सरकार भारत आणि हिंदुद्वेषी आहे, हेच यावरून स्पष्ट होते ! अशा सरकारशी भारताने कोणतेही संबंध न ठेवता त्याच्यावर बहिष्कारच घातला पाहिजे ! – संपादक
नवी देहली – अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमध्ये सहभागी असलेल्या ‘हक्कानी नेटवर्क’ या संघटनेचा प्रमुख अनस हक्कानी याने महमूद गझनी याच्या कबरीवर जाऊन डोके टेकले. यानंतर त्याने तेथील छायाचित्र प्रसारित करत ट्वीट केले. त्यात त्याने म्हटले आहे की, आज आम्ही १० व्या शतकातील प्रसिद्ध मुसलमान योद्धा आणि मुजाहिद (धर्मयोद्धा) सुलतान महमूद गझनवी याच्या मंदिरात भेट दिली. गझनवी याने गझनीपासून एक शक्तीशाली मुसलमान राजवट स्थापन केली आणि सोमनाथची मूर्ती फोडली.
Today, we visited the shrine of Sultan Mahmud Ghaznavi, a renowned Muslim warrior & Mujahid of the 10th century. Ghaznavi (May the mercy of Allah be upon him) established a strong Muslim rule in the region from Ghazni & smashed the idol of Somnath. pic.twitter.com/Ja92gYjX5j
— Anas Haqqani(انس حقاني) (@AnasHaqqani313) October 5, 2021
अनस हक्कानी याने काही दिवसांपूर्वी ‘भारत अफगाणिस्तानचा खरा मित्र नाही’, असे विधान केले होते.