‘रामायण’ मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन

कर्णावती (गुजरात) – दूरदर्शनवरील अत्यंत लोकप्रिय हिंदी मालिका ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे ५ ऑक्टोबर या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ‘रामायण’मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, लक्ष्मणाची भूमिका करणारे सुनील लाहिरी आदींनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. अरविंद त्रिवेदी भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवून खासदारही झाले होते. त्रिवेदी यांनी ३०० हून अधिक हिंदी आणि गुजराती चित्रपटांत काम केले आहे.