सध्या हलाल अर्थव्यवस्था ही आज जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था मानली जात आहे. यात वेगाने वाढणार्या मुसलमान लोकसंख्येचाही मोठा सहभाग आहे. गेल्या ५० वर्षांत इस्लामी देशांनी १० ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था उभी केली आहे. ही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या तिप्पट आहे. ‘हलालद्वारे मिळवलेला पैसा जगभरात इस्लामी वर्चस्व निर्माण करणे आणि आतंकवाद यांसाठी वापरला जात आहे’, अशी जगभरातील अनेक गुप्तचर संस्थांकडे माहिती आहे. त्यामुळे ‘निष्पाप मुसलमानांसाठी हलालचा पैसा वापरला जातो’, हा प्रचार खोटा आहे.