तमिळनाडूतील मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी ४ मासांत अतिक्रमणमुक्त !

  • इतकी वर्षे मंदिरांच्या भूमींवर अतिक्रमण होऊ देऊन मंदिरांचे लाखो कोटी रुपयांचे उत्पन्न बुडवणार्‍या संबंधितांना आजन्म कारागृहात टाका ! – संपादक
  • मंदिरांची भूमी अतिक्रमणमुक्त केली असली, तरीही त्यावर सत्ताधारी द्रमुक पक्षाचे ‘सरकारी’ अतिक्रमण कायम राहील, त्याचे काय ? – संपादक

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यात गेल्या ४ मासांपासून राबवण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी अभियानातून मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळाले आहे. द्रमुक सरकारने सत्तेत आल्यावर ही भूमी अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश दिला होता. राज्यात ४४ सहस्र मंदिरे असून त्यांची माहिती डिजिटल (संगणकीय प्रणालीद्वारे एकत्रित) करण्यात येत आहे.

राज्याचे मंत्री पी.के. शेखर बाबू यांनी सांगितले की, माझ्या विभागाचे अधिकारी मंदिरांच्या संपत्तीविषयीची कागदपत्रे डिजिटल करत आहेत. याद्वारे मंदिरांच्या भूमीची माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे.