राजकारण्यांनी मतांसाठी विविध लाभ देण्याच्या घोषणा करणे, म्हणजे मतदारांना एक प्रकारे लाच देणेच होय !

‘वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीद्वारे गोव्यामध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास नागरिकांना विविध लाभ देण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. या लाभांमध्ये सरकारी नोकर भरती पात्रतेनुसार पारदर्शक पद्धतीने करणार, घरटी एका व्यक्तीला रोजगार, बेरोजगारांना ३ सहस्र रुपये भत्ता, खासगी नोकर्‍यांत ८० टक्के आरक्षण, पर्यटनावर आणि खाणींवर अवलंबून असणार्‍यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा भत्ता देणार, तसेच रोजगारात कौशल्य प्राप्तीसाठी विद्यापिठाची स्थापना करणार, असे केजरीवाल यांनी सांगितले.’