किमान समान कार्यक्रमाच्या अंतर्गत गोव्यात ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना !

७७ संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्‍या १५० प्रतिनिधींच्या बैठकीत ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना करण्याचा ठराव संमत

पणजी, २७ सप्टेंबर – किमान समान कार्यक्रमाच्या अंतर्गत गोव्यात ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. गोव्यातील सर्व तालुक्यांतील विविध प्रकारचे कार्य करणार्‍या एकूण ७७ संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्‍या १५० प्रतिनिधींच्या बैठकीत ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना करण्याचा ठराव घेण्यात आला. यापुढे गोव्यातील छोट्या-मोठ्या किमान १ सहस्र हिंदु संस्थांशी संपर्क साधून त्यांना ‘हिंदु महाआघाडी’त सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

२५ सप्टेंबरला झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी ‘हिंदु महाआघाडी’चे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘संपूर्ण देशात आणि विशेषत: पंजाब, देहली, राजस्थान, बंगाल, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हिंदु समाजावर विविध प्रकारे अन्याय होत आहेत. गोव्यात हिंदूंच्या हिताकडे दुर्लक्ष करून फुटीरतावादाला खतपाणी घातले जात आहे. गोव्यात पाकिस्तानी आतंकवादी संघटना ‘आय.एस्.आय.’शी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेच्या कारवाया वाढत चालल्या आहेत. देशात घुसखोरी करणारे रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक यांना सर्वपक्षीय राज्यकर्ते आधारकार्डे, शिधापत्रके आदी देऊन पोसत आहेत.कयामुळे गोव्यात ठिकठिकाणी छोट्या पाकिस्तानची निर्मिती होत आहे.’’

बैठकीत झालेल्या चर्चेत ‘हिंदु पुनरुत्थान’चे सर्वश्री श्रीकांत बर्वे, मळकर्णे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मठाचे श्री. अरुण नाईक, ‘योगपिठा’चे डॉ. सूरज काणेकर, ‘भगवा हिंदु वाहिनी’चे श्री. शहा, ‘मातृशक्ती’च्या गोवा विभागप्रमुख सौ. शुभांगी गावडे, ‘छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती’चे श्री. ईश्वर कुबल, केपे येथील ‘आमोणा मठा’चे श्री. लक्ष्मण बोरकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी ‘हिंदु महाआघाडी’च्या कार्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. गोव्यातील हिंदूंच्या हितासाठी आवश्यकता भासल्यास इतर राज्यांतील हिंदु संघटनांचे सहकार्य घेण्याचे बैठकीत ठरले. बैठकीच्या अखेर ऋणनिर्देश करतांना प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी हिंदु संस्थांनी पहिल्याच बैठकीला अनपेक्षित आणि चांगला प्रतिसाद दिल्याविषयी सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले.

‘हिंदु महाआघाडी’ पुढील समान कार्यक्रमावर कार्य करणार

१. धर्मांतर, ‘भू-जिहाद’, ‘नार्काेटिक जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांना विरोध करणे

२. हिंदू आणि मंदिरे यांची सुरक्षा करणे

३. हिंदु संस्कारांचे रक्षण आणि धर्मशिक्षण देणे यांसाठी कार्य करणे