पंतप्रधान मोदी अमेरिका दौर्‍यावर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यासाठी मार्गस्थ

नवी देहली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ सप्टेंबर या दिवशी अमेरिकेच्या दौर्‍यासाठी मार्गस्थ झाले. त्यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे. ५ दिवसांच्या अमेरिका दौर्‍यात पंतप्रधान ‘क्वॉड परिषद’ आणि कोविड जागतिक परिषद यांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रालाही ते संबोधित करतील. कोरोना महामारीनंतरचा पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच मोठा दौरा आहे. या दौर्‍यात मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. क्वाड परिषदेमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.