भारताच्या विरोधानंतर ब्रिटनकडून ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता

१० दिवस अलगीकरणात रहाण्याची अट मात्र कायम

नवी देहली – ब्रिटनने ‘कोविशिल्ड’ या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना ‘त्यांनी लस घेतली आहे’, असे मानणार नाही’, असा निर्णय घेतला होता. यास भारताने केलेल्या विरोधानंतर ब्रिटनने हा निर्णय मागे घेतला आहे. तथापि या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतियांना ब्रिटनमध्ये गेल्यावर १० दिवस अलगीकरणात रहावे लागणार आहे. ही अट मात्र हटवण्यात आलेली नाही.