पारतंत्र्यातून मुक्त झाल्यावर त्या स्वातंत्र्याचे स्वतंत्रतेत रूपांतर केले पाहिजे !

कांचीपुरमचे शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र

१५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्यदिनी कांचीपुरमचे  शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र यांनी शासनकर्त्यांना केवढा मौलिक सल्ला दिला होता. ‘मुक्त झाल्यावर आपण त्या स्वातंत्र्याचे स्वतंत्रतेत रूपांतर केले पाहिजे.’ (‘Having become free, we must translate that freedom into indepndence’) कांचीपुरमच्या शंकराचार्यांनी मुक्त आणि स्वातंत्र्य या शब्दांत भेद केला आहे. राजकीय स्वातंत्र्यातून सांस्कृतिक स्वातंत्र्य उत्क्रांत व्हावे, हा आशय शंकराचार्यांच्या या संदेशात अध्याहृत (दडलेला) आहे ! प्रत्यक्षात स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा इतिहास मात्र वेगळीच कहाणी सांगत आहे.’

– डॉ. अशोक मोडक (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक, नोव्हेंबर-डिसेंबर २०११)