अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून महिला कल्याण मंत्रालय बंद !

भारतातील तालिबानीप्रेमी, महिला नेत्या, नामांकित महिला, तसेच जगभरातील महिला संघटना याविषयी बोलतील का ? – संपादक

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील ‘महिला कल्याण मंत्रालय’ तालिबान सरकारने बंद केले आहे. आता मंत्रालयाच्या ठिकाणी सद्गुणांचा प्रसार आणि दुर्गुण रोखण्यासाठीचे मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. (तालिबानकडून सद्गुणांचा प्रसार केला जाणार, हे नवलच म्हणावे लागेल ! – संपादक) हे मंत्रालय ज्या ठिकाणी होते, त्या इमारतीत काम करणार्‍या जागतिक बँकेच्या कर्मचार्‍यांनाही बलपूर्वक बाहेर काढण्यात आले आहे. तालिबानच्या मागील राजवटीतही मुली आणि महिला यांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला होता. तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनावर बंदी घातली होती.