राज्यात २ ठिकाणी पोलिसांकडून गांजा कह्यात

अमली पदार्थांनी पोखरलेला गोवा ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मडगाव – फातोर्डा पोलिसांनी १६ सप्टेंबरला झुआरीनगर, सांकवाळ येथील मंतेश नेवरागी या २६ वर्षीय युवकाला २ किलो गांजा (अंदाजे मूल्य २ लाख रुपये) बाळगल्याच्या प्रकरणी अटक केली. हा युवक २ किलो गांजा अन्य कुणालातरी विकण्यासाठी मडगाव कदंबा बसस्थानकावर आला असता त्याला अटक करण्यात आली.

पणजी – पणजी पोलिसांनी २ वेगवेगळ्या प्रकरणांत मूळ उत्तरप्रदेश येथील २ युवकांकडून १ किलो १० ग्रॅम; म्हणजे अंदाजे १ लाख १० सहस्र रुपयांचा गांजा कह्यात घेऊन त्यांना अटक केली. एक युवक २२ वर्षांचा, तर दुसरा २८ वर्षांचा आहे.