धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते !

अटकेतील ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत जिहादी आतंकवाद नष्ट न केल्याचा परिणाम ! हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

अटक केलेले आतंकवादी

नवी देहली – धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते, अशी धक्कादायक माहिती देहली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकत्याच अटक केलेल्या ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून उघड झाली. जान महंमद अली महंमद शेख उपाख्य समीर (वय ४७ वर्षे), उस्मान (वय २२ वर्षे), मूलचंद (वय ४७ वर्षे), झिशान कामर (वय २८ वर्षे), महंमद अबू बकर (वय २३ वर्षे) आणि महंमद आमिर जावेद (वय ३१ वर्षे) अशी अटक केलेल्या या ६ आतंकवाद्यांची नावे आहेत. यांतील जान महंमद अली महंमद शेख हा मुंबईच्या धारावी येथील रहिवासी आहे. तो मुंबई सेंट्रलवरून देहलीला रेल्वेने जात असतांना त्याला कोटा येथून अटक करण्यात आली. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी या आतंकवाद्यांनी आणलेले दीड किलो स्फोटकेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या आतंकवाद्यांच्या अटकेमुळे घातपाताचा मोठा कट उधळला गेला आहे.