पंजशीरच्या ‘नॅशनल रेजिस्टेंस फ्रंट’चा प्रवक्ता फहीम दश्ती ठार होण्याला बीबीसी कारणीभूत असल्याचा सामाजिक माध्यमांतून आरोप

बीबीसीवर कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणाची गांभीरतेने चौकशी करून यात जर बीबीसीने जाणीवपूर्वक तालिबानला साहाय्य केल्याचे समोर आले, तर बीबीसीवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक

‘नॅशनल रेजिस्टेंस फ्रंट’चा प्रवक्ता फहीम दश्ती

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांतावर ५ सप्टेंबर या दिवशी तालिबानने केलेल्या आक्रमणात ‘नॅशनल रेजिस्टेंस फ्रंट’चा प्रवक्ता फहीम दश्ती आणि कमांडर जनरल साहिब अब्दुल वदूद यांचा मृत्यू झाला. हे दोघेही या फ्रंटचे मोठे नेते होते.

यामुळे फ्रंटची मोठी हानी झाली आहे. सामाजिक माध्यमांतून या मृत्यूला बीबीसीची चूक कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
तालिबानला फहीम याच्याविषयी माहिती कशी मिळाली, यावरून बीबीसीकडे बोट दाखवले जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की, बीबीसीनेच फहीम दश्ती याचा सॅटेलाईट क्रमांक सार्वजनिक केला. त्यामुळे दश्ती कुठे लपला आहे, हे तालिबानला शोधण्यास सोपे गेले आणि त्याने त्याच्यावर आक्रमण केले. यामुळे बीबीसीवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांकडे करण्यात येत आहे.