काबुलमध्ये पाकिस्तानच्या विरोधात मोर्चा काढणार्‍यांना रोखण्यासाठी तालिबान्यांकडून हवेत गोळीबार

यातून तालिबान्यांचे पाकिस्तानप्रेम अधिक स्पष्ट होते ! तालिबानला साहाय्य करणार्‍या पाकच्या विरोधात जगातील एकही देश तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

आंदोलनकर्ता जमाव

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील घडामोडींमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत येथे मोर्चा काढण्यात आला होता. जवळपास ७० लोक पाकिस्तानी दूतावासाबाहेर आंदोलन करत होते. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. ‘पाक आणि आय.एस्.आय. हे अफगाणिस्तानात हस्तक्षेप करत आहेत’, या विरोधात हातात फलक धरून घोषणा देण्यात आल्या. यामुळे आंदोलकांना तेथून पांगवण्यासाठी तालिबान्यांनी हवेत गोळीबार केला. आय.एस्.आय.चे संचालक गेल्या एक आठवड्यापासून येथील सेरेना हॉटेलमध्ये वास्तव्यास असून आंदोलक त्या दिशेने निघाले होते.