‘दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेच्या वतीने चालू करण्यात आलेले ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकून फलटण, सातारा येथील श्रीमती मालन बन्यासो भापकर यांनी गुरुपौर्णिमेपासून साधनेला आरंभ केला आहे.
१. साधनेची तळमळ असणे
मालनताई भावपूर्णरित्या नामस्मरण आणि प्रार्थना करतात. त्या घरातील सर्व कामे सेवा म्हणून करतात. ‘प्रतिदिन सत्संग ऐकायला मिळावा’, अशी त्यांची तळमळ असते. सत्संगात सांगितलेल्या सर्व गोष्टी त्या लगेच कृतीत आणतात. त्या घरातील सर्वांना साधनेचे महत्त्व सांगतात आणि घरी येणार्या व्यक्तींनाही साधना सांगतात. ‘साधना करून लवकर गुरुमाऊलीच्या चरणांशी जायचे आहे’, असे त्या म्हणतात.
२. अनुभूती – देवघरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जास्वंदीची फुले आढळल्यावर भाव जागृत होणे
त्यांची प.पू. गुरुमाऊली आणि श्रीकृष्ण यांच्यावर श्रद्धा आहे. त्यांना वैशिष्टपूर्ण अनुभूतीही येतात. एकदा सकाळी त्या देवपूजा करायला देवघरात गेल्या. तेव्हा त्यांना श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जास्वंदीची ३ ताजी फुले दिसली. त्यांनी घरातील सर्वांना विचारले, ‘‘ही फुले कुणी आणली ?’’ तेव्हा त्यांना ‘घरातील कुणीच ती फुले आणली नव्हती’, हे समजले. तेव्हा ‘साक्षात् भगवंताने ही अनुभूती दिली आहे’, असे त्यांना वाटले आणि त्यांचा भाव दाटून आला.’
– सौ. शारदा कापसे (श्रीमती मालन भापकर यांची मुलगी), फलटण, सातारा. (१८.८.२०२०)
|