पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्या लिखाणाचे संकलन करतांना जाणवलेली सूत्रे

‘पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ च्या उत्तररात्री देहत्याग केल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचले. पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांना मिळत असलेल्या ज्ञानाच्या लिखाणाचे संकलन करतांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज

१. ज्ञानाचे लिखाण सोप्या भाषेत मांडल्यामुळे त्याचे सहज आकलन होणे

सौ. कविता बेलसरे

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांना ईश्वराकडून मिळत असलेल्या ज्ञानाच्या काही लिखाणाचे प्राथमिक संकलन करण्याची सेवा माझ्याकडे होती. ही सेवा करतांना मला पुष्कळ शिकायला मिळाले. त्यांच्या लिखाणात भक्ती आणि ज्ञान यांचा संगम आहे. त्यांना मिळत असलेले ज्ञान त्यांनी सोप्या भाषेत मांडल्यामुळे त्याचे सहज आकलन होते. त्यांनी त्यांच्या लिखाणात जीवन जगण्याचे सार मांडले आहे. ही सेवा करतांना मला आनंद मिळायचा.

‘पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी सांगितल्यानुसार मला आचरण करता येऊ दे’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.

२. ‘ग्रंथ लवकर प्रकाशित व्हावा’, ही तळमळ असणे

त्यांच्या लिखाणातून ‘ग्रंथ लवकर प्रकाशित व्हावेत’, अशी त्यांची तळमळ दिसायची. त्यांचा पहिला ग्रंथ लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे समजले; परंतु ‘पू. बांद्रे महाराज असतांना ग्रंथ प्रकाशित झाला असता, तर त्यांना किती आनंद झाला असता !’, असे मला वाटले.

‘गुरुदेव, मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. आपण आमच्यासाठी ज्ञानाचा सागर उपलब्ध करून देत आहात. ‘या ज्ञानसागरात न्हाऊन मला पूर्णतः शुद्ध आणि पवित्र होता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. कविता बेलसरे, पुणे (२६.८.२०२१)