आले श्री गुरुराया घरा, हर्ष झाला वास्तुदेवतेला ।

श्रीमती उषा बडगुजर

आले श्री गुरुराया घरा ।
हर्ष दाटला मनी
वास्तुदेवतेच्या ।।
वृक्ष-वेली हात जोडूनी
स्वागता ।
पाने-फुले म्हणाली,
‘आनंदाने नाचूया’ ।। १ ।।

पानांनी अंथरला गालीचा ।
फुलांनी टाकला सडा ।।
आपण आहोत भाग्यवान ।
ईश्वरी चरणस्पर्श होणार म्हणून कोटीशः कृतज्ञता ।। २ ।।

गुरुरायांचे आगमन होता, वास्तुदेवता उभी पूजनाला ।
नयनी दाटले भावाश्रू, ईश्वर भेटला मजला ।
वास्तू म्हणे, ‘माझे त्रास दूर होऊन पसरेल सर्वत्र चैतन्य’ ।। ३ ।।

वास्तूतील वस्तू म्हणतात, ‘आम्ही आहोत भाग्यवान’ ।
गुरूंची दृष्टी पडून अन् त्यांच्या स्पर्शाने
आम्ही होणार पावन ।। ४ ।।

वास्तूदेवता म्हणते, ‘करते गुरुचरणी प्रार्थना ।
या वास्तूतील साधकांना करण्या मिळावी गुरुसेवा’ ।। ५ ।।

वास्तू पावन झाली गुरुकृपेने ।
श्री गुरुरायांच्या चरणी कृतज्ञता अर्पितो भक्तीभावाने ।। ६ ।।

– श्रीमती उषा बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), जळगाव (१३.५.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक